Headlines

Sanjay Raut Letter to CM: संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी…

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणावरून सध्या राज्यासह देशाचं राजकारण कमालीचं तापलं आहेअशातच ठाकरेंची शिवसेना (Shivsena) देखील याच प्रकरणावरून आक्रमक झाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात रामरक्षा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शिवसेना पक्षातील आमदारांनाही मतदारसंघात या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेण्याचं सांगण्यात आलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी स्वत: मैदानात उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहेअशातच आता दादर येथील राम मंदिरात जाऊन रामरक्षा आंदोलन केल्यानंतर 18 जुलै रोजी नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं असून रामरक्षा आंदोलना सहभागी होण्याचं निमंत्रण धाडलं.

Sanjay Raut Latter to CM संजय राऊत पत्रात नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसजी आपण एक प्रखर रामभक्त आणि कडवट हिंदुत्ववादी आहात. अयोध्येतील राम जन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनात आपण सहभागी झाल्याचे आपण नेहमी सांगता. आपल्यासारख्या लाखो राम भक्तांच्या संघर्षातून राम जन्मभूमी मुक्त झाली व अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले. याच राम मंदिरात चोरी, लुटमार, फसवणूक असे गुन्हे घडत आहेत व शेकडो कोटींचा अपहार झाला. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अयोध्येतील चोरीबाबत ‘शोक’ व्यक्त केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या राम मंदिर लुटीबाबत लोकांत जागृती आणण्यासाठी ‘रामरक्षा’ उपक्रम सुरू केला. रामरक्षा म्हणजे रामाची सुरक्षा हे समजून घ्या.

दरम्यान, दि.18 जुलै, 2026 शनिवार सायंकाळी 4.30 वाजता राम मंदिर रामनगर, नागपूर येथे, ‘रामरक्षा’ उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे. सदर कार्यक्रम नागपुरात होत असल्याने आपण या ‘रामरक्षा’ उपक्रमात आवर्जुन सहभागी होऊन राम भक्तांना शुभेच्छा द्याव्यात, ही आग्रहाची विनंती!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *