मुंबई म्हाडाच्या लॉटरी कधी काढण्यात येणार याकडे हजारो अर्जदारांचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्या 75 हजारांहून अधिक अर्जदारांना अखेर दिलासा मिळणार आहे. मुंबई मंडळाच्या 2,640 घरांसाठीच्या लॉटरीची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सोडत जारी करण्यात येणार आहे.
मुंबई महामंडळाच्या 2,640 घरांसाठी 6 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वांद्रे (पश्चिम) येथे रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लॉटरीची तारीख जाहीर करण्याचे म्हाडाने आश्वासन दिले होते. मात्र, ऑगस्ट सुरू झाला असला तरी सोडतीची वेळ निश्चित न झाल्याने अर्जदारांची कोट्यवधी रुपयांची अनामत रक्कम अडकून पडली होती. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांबरोबरच राजकीय नेत्यांकडूनही असंतोष निर्माण झाला होता. अखेर आता सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
दरम्यान, एका घरासाठी साधारणपणे 28 ते 29 जणांचे अर्ज म्हाडाकडे आले आहेत. तर, एकूण 2,640 घरांसाठी एकूण 75,366 घरांसाठी अर्ज आले आहेत. तर, एका घरासाठी 28 ते 29 जण शर्यतीत आहेत.
गोरेगाव (पंतप्रधान आवास योजना) येथील घरांना सर्वात जास्त पसंती मिळाली आहे. येथील फक्त 13 घरांसाठी 17,755 अर्ज आले असून, एका घरासाठी 1,365लोक शर्यतीत आहेत. घराची किमत 32.36 लाख आहे. मानखुर्द येथील 4 घरांसाठी 48 अर्ज आले आहेत. घराची किंमत 29.37 लाख आहे. ताडदेव (क्रिसेंट टॉवर) येथे अत्यंत महागड्या अशा ६ कोटी ८२ लाख रुपयांच्या २ घरांसाठी २१ जणांनी अर्ज केला आहे.
विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगरमधील 1,221 घरांच्या किमतीत म्हाडाने ७.५ टक्के कपात केली आहे. यापैकी 610 घरे उच्च उत्पन्न गटासाठी राखीव ठेवली आहेत.
उत्पन्न गटानुसार उपलब्ध घरे
145 अत्यल्प उत्पन्न गट
858 अल्प उत्पन्न गट
798 मध्यम उत्पन्न गट
839 उच्च उत्पन्न गट
कुठे पाहता येणार म्हाडा लॉटरीचा रिझल्ट?
– म्हाडाच्या मुख्य वेबसाइटवर किंवा संबंधित प्रादेशिक मंडळाच्या (उदा. मुंबई, पुणे, कोकण) पोर्टलवर जा.
– होमपेजवरील ‘Lottery Result’ (लॉटरी निकाल) या पर्यायावर क्लिक करा.
– तुमचा अर्ज क्रमांक (Application Number) किंवा लॉगिन तपशील प्रविष्ट करा.
– विजेत्यांची योजनानिहाय आणि उत्पन्न गटानुसार (Income Group) तयार केलेली यादी स्क्रीनवर दिसेल.
– ऑनलाईन माध्यम: म्हाडाची अधिकृत वेबसाईट किंवा MHADA IHLMS 2.0 मोबाईल अॅप
