दिल्लीच्या जंतर-मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी चांगलीच आक्रमक झाली आहे. यावेळी या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरेकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला, यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. 20 जुलै रोजी जंतर-मंतरवर पोलिसांचा लाठीचार्ज सुरु असताना तिथे फूड डिलीव्हरी बॉय पोहचला. महाराष्ट्रातून जेवण ऑर्डर करण्यात आले होते. जेवण ऑर्डर करणाऱ्याचे नाव आणि जेवण पाठवण्याचे कारण जाणून सगळेच शॉक झाले.
जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान फूड पार्सल देण्यासाठी पोहचलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर हजारो कमेंट आल्या आहे. लाठी चार्ज सुरु असताना रिस्क घेऊन जंतर मंतरवर जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या या डिलीव्हरी बॉयचे सर्वचजण कौतुक करत आहेत.
जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान 20 जुलैच्या संध्याकाळी एक डिलीव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला. भर गर्दीत पोहचलेल्या डिलीव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही ऑर्डर कुणी केली आणि कुणाला द्यायला सांगितली याबाबत या डिलीव्हरी बॉयने व्हिडिओत सांगितले आहे. त्याने दिलेले माहिती ऐकून सगळेच चकित झाले.
“महाराष्ट्रामध्ये अमित रावत नावाचा एक भाऊ आहे. त्याने जेवण ऑर्डर केले आहे. जंतर मंतर जो कुणी भुकेलेला असेल त्याला त्याने हे जेवण देण्यास सांगितले. जो भुकेलेला दिसेल त्याला जेवण असा मेसेज अमित रावत याने दिला आहे. अमित रावत याने या पार्सनचे ऑनलाइन पेमेंट आधीच केलेले आहे.
सचिन गुप्ता (@Sachingupta) नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ एक्स (X) वर पोस्ट केला. महाराष्ट्रातील अनुज रावत यांनी झोमॅटोवरून जेवण मागवले आणि डिलिव्हरी बॉयला सांगितले की, जंतर मंतरवर जो कोणी भुकेला दिसेल त्याला जेवण द्या.
