Headlines

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत शासनाच्या निर्देशानुसार समाजातील विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात (NCMC Card ST Bus) येते. या सवलतींचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावीपणे मिळावा, यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड देण्याची (NCMC Card ST Bus) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण (NCMC Card ST Bus) भागातील अनेक महिला लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंत्या व सूचनांचा सकारात्मक विचार करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.(NCMC Card ST Bus) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी 1 ऑक्टोबर 2026 पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे 1 कोटी 10 लाख कार्डांची नोंदणी व वितरण करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचली नसल्याने त्या अद्याप स्मार्ट कार्डपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून ही शिबिरे राबविण्यात येणार आहेत. या विशेष मोहिमेद्वारे 31 डिसेंबर 2026 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची 100 टक्के एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे.(NCMC Card ST Bus) महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा; कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या आणि ग्रामीण भागात कार्ड नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंत्यांचा सकारात्मक विचार करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड नसतानाही उद्या, दि. 7 नोव्हेंबर 2026 पासून 31 डिसेंबर 2026 पर्यंत एसटीच्या प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे कार्ड नोंदणी अद्याप पूर्ण न झालेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मुदतवाढीच्या कालावधीत सर्व पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांनी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतींच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. विशेष नोंदणी मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड पोहोचविण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत शासनाच्या निर्देशानुसार समाजातील विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात (NCMC Card ST Bus) येते. या सवलतींचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावीपणे मिळावा, यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड देण्याची (NCMC Card ST Bus) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण (NCMC Card ST Bus) भागातील अनेक महिला लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंत्या व सूचनांचा सकारात्मक विचार करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.(NCMC Card ST Bus)

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी 1 ऑक्टोबर 2026 पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे 1 कोटी 10 लाख कार्डांची नोंदणी व वितरण करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचली नसल्याने त्या अद्याप स्मार्ट कार्डपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून ही शिबिरे राबविण्यात येणार आहेत. या विशेष मोहिमेद्वारे 31 डिसेंबर 2026 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची 100 टक्के एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे.(NCMC Card ST Bus)

महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा; कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ

महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या आणि ग्रामीण भागात कार्ड नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंत्यांचा सकारात्मक विचार करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड नसतानाही उद्या, दि. 7 नोव्हेंबर 2026 पासून 31 डिसेंबर 2026 पर्यंत एसटीच्या प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे कार्ड नोंदणी अद्याप पूर्ण न झालेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या मुदतवाढीच्या कालावधीत सर्व पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांनी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतींच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. विशेष नोंदणी मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड पोहोचविण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *