Headlines

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांची तब्येत खालावली; रुग्णालयात केलं दाखल

दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

परीक्षेतील अनियमिततेप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पक्षाकडून (सीजेपी) गेल्या २1 दिवसांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या प्रकृतीबाबत चिंताही व्यक्त करण्यात आली होती. उपोषण काळात त्यांचे वजनही आठ किलोंनी घटले होते. आज सकाळीच त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. वांगचुक यांना रुग्णालयात नेत असताना उपोषणस्थळी मोठा गोंधळ झाला आहे. त्यानंतर जंतर मंतरवर मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोनम वांगचुक यांनी 28 जून रोजी या आंदोलनात सहभाग घेत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या 17व्या दिवशीही त्यांचे वजन आणि रक्तदाब कमी झाला होता. मात्र सरकारने चर्चेची प्रक्रिया सुरू केल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. तसंच, काही दिवसांपूर्वी वांगचुक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओदेखील पोस्ट केला होता. या व्हिडिओत त्यांनी म्हटलं होतं की, काहीही झालं तरी मी 20 जुलैपर्यंत जिवंत राहीनच. जेणेकरुन मला तुमच्याबरोबर चलो संसदे मोर्चात सहभागी होता येईल. 20 जुलै रोजीचे मार्च यशस्वी झाले नाही तर मी भूत बनून माघारी येईन, असं सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे.

वांगचुक यांचे 21 दिवसांपासून उपोषण

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी नीट पेपरफुटीप्रकरणी पुण्यातून आंदोलनाची हाक दिली. देशभर आंदोलनानंतर दिपके दिल्लीत आले. दिल्लीत आंदोलन झाल्यानंतर त्यांनी उपोषणाची हाक दिली. 21 दिवसांपासून वांगचुक उपोषण करत आहेत. देशभरातील सिने कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *