Headlines

LPG Rate Today: देशात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत, महाराष्ट्रातील सिलेंडर आणि PNG चे आजचे दर जाणून घ्या

जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील घरगुती गॅस पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशभरात LPG आणि PNG चा पुरवठा सुरळीत असल्याचं स्पष्ट केलं आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, देशातील LPG वितरकांकडे पुरेसा साठा उपलब्ध असून, कोणत्याही ठिकाणी LPG चा तुटवडा निर्माण झाल्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे सध्या ग्राहकांना गॅसच्या उपलब्धतेबाबत चिंता करण्याचं कारण नाही.

LPG बुकिंगमध्ये ऑनलाइन पर्यायाला वाढता प्रतिसाद

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील जवळपास 98 टक्के LPG बुकिंग ऑनलाइन होत आहे. स्थलांतरित कामगारांसाठी 5 किलोचे फ्री-ट्रेड LPG सिलेंडरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गेल्या महिन्याच्या 23 तारखेपासून अशा सिलिंडरची 14 लाख रुपयांहून अधिक किमतीची विक्री झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. PNG बाबतही ग्राहकसंख्या वाढताना दिसत आहे. मार्चपासून देशभरात 4 लाखांहून अधिक नवीन PNG कनेक्शन सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे 4.88 लाख ग्राहकांनी नवीन PNG कनेक्शनसाठी नोंदणी केली आहे.

व्यावसायिक LPG च्या विक्रीतही मोठी हालचाल झाली असून, गेल्या महिन्याच्या 14 तारखेपासून आतापर्यंत 1.31 लाख मेट्रिक टनांहून अधिक कमर्शियल LPG विकला गेल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे.

महाराष्ट्रातील LPG सिलेंडरचे आजचे दर

खाली 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरसोबत 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरचे शहरनिहाय दर दिले आहेत. आपापल्या शहरांचे दर जाणून घ्या.

  • अहमदनगर — घरगुती ₹955.50 | कमर्शियल ₹2,780.50
  • अकोला — घरगुती ₹962.00 | कमर्शियल ₹2,820.00
  • अमरावती — घरगुती ₹975.50 | कमर्शियल ₹2,850.50
  • छत्रपती संभाजी नगर — घरगुती ₹950.50 | कमर्शियल ₹2,796.50
  • भंडारा — घरगुती ₹1,002.00 | कमर्शियल ₹2,927.00
  • बीड — घरगुती ₹967.50 | कमर्शियल ₹2,826.50
  • बुलढाणा — घरगुती ₹956.50 | कमर्शियल ₹2,799.50
  • चंद्रपूर — घरगुती ₹990.50 | कमर्शियल ₹2,902.50
  • धुळे — घरगुती ₹962.00 | कमर्शियल ₹2,807.00
  • गडचिरोली — घरगुती ₹1,011.50 | कमर्शियल ₹2,941.50
  • गोंदिया — घरगुती ₹1,010.50 | कमर्शियल ₹2,941.50
  • ग्रेटर मुंबई — घरगुती ₹941.50 | कमर्शियल ₹2,691.50
  • हिंगोली — घरगुती ₹967.50 | कमर्शियल ₹2,822.50
  • जळगाव — घरगुती ₹947.50 | कमर्शियल ₹2,780.50
  • जालना — घरगुती ₹950.50 | कमर्शियल ₹2,803.00
  • कोल्हापूर — घरगुती ₹944.50 | कमर्शियल ₹2,715.00
  • लातूर — घरगुती ₹966.50 | कमर्शियल ₹2,817.50
  • मुंबई — घरगुती ₹941.50 | कमर्शियल ₹2,691.50
  • नागपूर — घरगुती ₹993.50 | कमर्शियल ₹2,915.50
  • नांदेड — घरगुती ₹967.50 | कमर्शियल ₹2,822.50
  • नंदुरबार — घरगुती ₹954.50 | कमर्शियल ₹2,718.50
  • नाशिक — घरगुती ₹945.50 | कमर्शियल ₹2,767.00
  • धाराशिव — घरगुती ₹966.50 | कमर्शियल ₹2,823.50
  • पालघर — घरगुती ₹953.50 | कमर्शियल ₹2,720.50
  • परभणी — घरगुती ₹968.00 | कमर्शियल ₹2,828.00
  • पुणे — घरगुती ₹945.00 | कमर्शियल ₹2,752.00
  • रायगड — घरगुती ₹952.50 | कमर्शियल ₹2,717.50
  • रत्नागिरी — घरगुती ₹956.50 | कमर्शियल ₹2,783.50
  • सांगली — घरगुती ₹944.50 | कमर्शियल ₹2,715.00
  • सातारा — घरगुती ₹946.50 | कमर्शियल ₹2,758.50
  • सिंधुदुर्ग — घरगुती ₹956.00 | कमर्शियल ₹2,742.00
  • सोलापूर — घरगुती ₹949.50 | कमर्शियल ₹2,791.50
  • ठाणे — घरगुती ₹941.50 | कमर्शियल ₹2,693.00
  • वर्धा — घरगुती ₹1,002.00 | कमर्शियल ₹2,931.50
  • वाशिम — घरगुती ₹962.00 | कमर्शियल ₹2,813.00
  • यवतमाळ — घरगुती ₹983.50 | कमर्शियल ₹2,865.00

महाराष्ट्रातील PNG चे आजचे दर

महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पाइप्ड नॅचरल गॅस अर्थात PNG चे दर पुढीलप्रमाणे आहेत.

  • अहमदनगर — ₹48.50
  • अकोला — ₹51.40
  • अमरावती — ₹51.40
  • छत्रपती संभाजी नगर — ₹48.50
  • भंडारा — ₹51.40
  • गोंदिया — ₹51.40
  • हिंगोली — ₹51.40
  • कोल्हापूर — ₹49.82
  • लातूर — ₹45.50
  • मुंबई — ₹51.50
  • नागपूर — ₹48.30
  • नंदुरबार — ₹48.31
  • नाशिक — ₹50.25
  • धाराशिव — ₹45.50
  • पालघर — ₹50.87
  • पुणे — ₹51.00
  • रायगड — ₹51.50
  • रत्नागिरी — ₹45.50
  • सांगली — ₹48.50
  • सातारा — ₹48.50
  • सिंधुदुर्ग — ₹49.25
  • सोलापूर — ₹48.50
  • ठाणे — ₹51.50
  • वाशिम — ₹51.40
  • यवतमाळ — ₹51.40

LPG च्या किमती कमी होणार का?

घरगुती LPG च्या विक्रीवर सरकारी तेल कंपन्यांना होणारा तोटा कमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या LPG सिलिंडरवरील महसुली तोटा जुलै महिन्यात सुमारे ₹500 होता, जो ऑगस्टमध्ये कमी होऊन ₹188 प्रति सिलिंडर इतका राहिला आहे. दिल्लीमध्ये जून 2026 पासून इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्या घरगुती ग्राहकांना 14.2 किलोचा LPG सिलिंडर ₹942 दराने विकत असल्याचंही सरकारने संसदेत सांगितलं आहे.

सध्या महाराष्ट्रात घरगुती LPG च्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि सरकारी तेल कंपन्यांच्या पुढील निर्णयाकडे ग्राहकांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *