‘मिशन टायगर’च्या यशानंतर शिंदेंचं ‘मिशन सेना भवन’? दादरऐवजी ‘इथं’ उभारणार आपलं हेडक्वार्टर?
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झालं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून मागील चार वर्षांमध्ये शिंदेंनी दुसऱ्यांदा ठाकरेंना धक्का दिला आहे. 2022 साली शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचं नाव आणि मूळ चिन्हावरील दावा सांगितल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गोष्टी शिंदें गटाला दिल्यानंतर शिंदेंनी विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीमध्ये…
