अनोख्या रचनेमुळे देशभरात चर्चेत आलेला मिरा-भाईंदरमधील ‘बॉटल नेक’ पूल अखेर रविवारी गुपचूप नागरिकांच्या सेवेत दाखल झाला. पुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही उद्घाटनाअभावी तो अनेक महिने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने मनसेने पूल ४८ तासांत खुला करण्याचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच रविवारी भाजपच्या वतीने पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
पुलाच्या रचनेत आवश्यक सुधारणा
मिरा-भाईंदर शहरात प्रवेशासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोल्डन नेस्ट हा मुख्य मार्ग असून, त्याला अनेक पर्यायी रस्ते जोडलेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील चौकांमध्ये सातत्याने वाहतूककोंडी होत होती. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नागपूरच्या धर्तीवर मेट्रोला समांतर तीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. या योजने अंतर्गत तीन पूल उभारण्यात आले असून, त्यापैकी दोन पूल वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत. गोल्डन नेस्ट येथील पुलाचे काम सुमारे सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, पुलावरील चार पदरी मार्ग पुढे दोन पदरी होत असल्याने त्याचे छायाचित्र ‘बॉटल नेक’ पूल या नावाने समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर पुलाच्या सुरक्षेबाबत आणि एमएमआरडीएच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानुसार सुरक्षेच्या दृष्टीने पुलाच्या रचनेत आवश्यक सुधारणा करण्यात आल्या.
सुधारणांची कामे पूर्ण होऊनही सुमारे दोन महिन्यांहून अधिक काळ हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी शुक्रवारी ४८ तासांत पूल खुला न झाल्यास तो नागरिकांसाठी स्वतःहून खुला करण्याचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच कोणताही गाजावाजा न करता रविवारी सकाळी भाजपचे
आता काशिमिरा जोडपुल्याची प्रतीक्षा
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काशिमिरा पुलावरून डाव्या बाजूने थेट मिरा-भाईंदरमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी विद्यमान पुलाला नवीन जोडपूल उभारण्याचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. हा पूल झाल्यानंतर सुरू महामार्गावरून थेट भाईंदर फाटकापर्यंत सुमारे साडेचार किलोमीटरचा प्रवास वाहतूककोंडीविना करता येणार आहे. त्यामुळे या पुलाच्या कामाकडे आता मिरा-भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता आणि अन्य नगरसेवकांच्या उपस्थितीत पुलाचे उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. विकासकामांच्या उद्घाटनावेळी नेहमीप्रमाणे मोठा गाजावाजा, फलकबाजी किंवा निमंत्रणपत्रिकांचे वाटप यावेळी करण्यात आले नाही.
