बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
जिल्ह्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचाची अमानुष हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर बीडमधील (Beed) गुन्हेगारीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. अद्यापही बीडमधील गुन्हेगारीला आळा बसत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथील ऊसतोड मजूर देविदास कापसे यांचे उचलीच्या पैशासाठी अपहरण करून तब्बल चार दिवस अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उचल परत…
