कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेले पुण्यातील 52 भाविक काठमांडूमध्ये अडकले, व्हिसा मिळण्यात अडचणी
कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या पुण्यातील ५२ भाविकांना चीनचा व्हिसा न मिळाल्याने ते सध्या नेपाळची राजधानी काठमांडू येथे अडकून पडले आहेत. यात्रेसाठी आवश्यक असलेले सर्व दस्तऐवज, अर्ज आणि औपचारिकता वेळेत पूर्ण करूनही ऐनवेळी व्हिसा मंजूर न झाल्याने या भाविकांची यात्रा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेष म्हणजे, चीन सरकारने यात्रेसाठी आवश्यक असलेले परमिट मंजूर केले असतानाही व्हिसा प्रक्रियेत…
