अमित शाह यांच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे; टिळक पुरस्कार त्यांच्या हस्ते देणं नैतिकदृष्ट्या अधःपतन; संजय राऊतांचा संताप
अमित शाह उद्या पुण्यात चालले आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराचं प्रदान त्यांच्या हस्ते होणार आहे. लोकमान्य टिळक यांच्यासारखा स्वातंत्र्यलढ्यातील कर्ता पुरुष, ज्यांनी स्वाभिमानाने, अभिमानाने, शौर्याने ईस्ट इंडिया कंपनीशी दोन हात केले, तुरुंगवास भोगला त्यांच्या नावाचा पुरस्कार सध्याच्या ईस्ट इंडिया कंपनीने व्यवस्थापकीय संचालक अमित शाह यांच्या हस्ते देण्याचा घाट घाटला ज्यांनी घातला आहे त्यांच्या बुद्धीची किव येते…
