‘गॅलेक्सी’ हे राहतं घर सोडणार सलमान; का आली भाईजानवर ही वेळ?
हिंदी कलाविश्वामध्ये चाहत्यांचं अमाप प्रेम असणाऱ्या कलाकारांचं नाव घेतलं, की यामध्ये काही नावं हमखास समोर येतात आणि सलमान खान हे त्यातलंच एक नाव. या अभिनेत्याच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर सातत्यानं असणारी चाहत्यांची गर्दी, भाईजानचा वाढदिवस असो किंवा मग त्याच्या नव्या चित्रपटाचं निमित्त, सलमानवर जीव लावणारे अनेकजण त्याची एक झलक टीपण्यासाठी वांद्रे येथील त्याच्या गॅलेक्सी नावाच्या निवासस्थानाबाहेर गर्दी…
