Headlines

Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे सर्वाधिक आणि सर्वात कमी दर कुठे आहेत? जाणून घ्या आजचे भाव

देशभरात 20 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग दुसऱ्या दिवशी इंधनाचे दर स्थिर राहिल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत असल्याने आगामी काळात इंधनदरांबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर जागतिक तेलपुरवठ्याबाबतची चिंता काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे क्रूड ऑईलच्या किमतींवर दबाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे.

निर्यात शुल्कात बदल?

केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या पंधरवड्याच्या आढाव्यात डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) वरील निर्यात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 16 जूनपासून लागू झालेल्या नव्या दरानुसार डिझेलवरील निर्यात शुल्क 13.5 रुपयांवरून 14 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. तर ATF वरील शुल्क 9.5 रुपयांवरून 12.5 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवण्यात आले आहे. पेट्रोलवरील निर्यात शुल्क मात्र 1.5 रुपये प्रति लिटर कायम ठेवण्यात आले आहे.

देशातील सर्वाधिक आणि सर्वात कमी इंधनदर

देशात सर्वाधिक महाग पेट्रोल हैदराबादमध्ये विकले जात असून तेथे पेट्रोलचा दर 115.69 रुपये प्रति लिटर आहे. तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 115.49 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. डिझेलच्या बाबतीत तिरुवनंतपुरम अव्वल असून तेथे डिझेलचा दर 104.40 रुपये प्रति लिटर आहे. त्यापाठोपाठ हैदराबादमध्ये डिझेल 103.82 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. दुसरीकडे, चंदीगडमध्ये देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळत असून त्याचा दर 98.10  रुपये प्रति लिटर आहे. डिझेलदेखील चंदीगडमध्येच सर्वात स्वस्त असून त्याची किंमत 86.09 रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोलचे दर

  • जालना – ₹113.21 प्रति लिटर
  • जळगाव – ₹113.17 प्रति लिटर
  • नांदेड – ₹113.17 प्रति लिटर
  • परभणी – ₹113.17 प्रति लिटर
  • यवतमाळ – ₹113.17 प्रति लिटर
  • रत्नागिरी – ₹113.13 प्रति लिटर
  • बीड – ₹113.11 प्रति लिटर
  • हिंगोली – ₹113.08 प्रति लिटर
  • औरंगाबाद – ₹113.00 प्रति लिटर
  • गडचिरोली – ₹112.91 प्रति लिटर
  • लातूर – ₹112.85 प्रति लिटर
  • अमरावती – ₹112.78 प्रति लिटर
  • सांगली – ₹112.74 प्रति लिटर
  • सातारा – ₹112.73 प्रति लिटर
  • नंदुरबार – ₹112.64 प्रति लिटर
  • सोलापूर – ₹112.64 प्रति लिटर
  • चंद्रपूर – ₹112.59 प्रति लिटर
  • वाशीम – ₹112.58 प्रति लिटर
  • भंडारा – ₹112.56 प्रति लिटर
  • बुलढाणा – ₹112.55 प्रति लिटर
  • अकोला – ₹112.20 प्रति लिटर
  • अहमदनगर – ₹112.12 प्रति लिटर
  • नागपूर – ₹112.10 प्रति लिटर
  • कोल्हापूर – ₹112.09 प्रति लिटर
  • नाशिक – ₹112.02 प्रति लिटर
  • पालघर – ₹112.00 प्रति लिटर
  • वर्धा – ₹111.85 प्रति लिटर
  • ठाणे – ₹111.79 प्रति लिटर
  • पुणे – ₹111.71 प्रति लिटर
  • धुळे – ₹111.70 प्रति लिटर
  • रायगड – ₹111.46 प्रति लिटर
  • ग्रेटर मुंबई – ₹111.21 प्रति लिटर
  • मुंबई – ₹111.18 प्रति लिटर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील डिझेलचे दर

  • जालना – ₹99.87 प्रति लिटर
  • जळगाव – ₹99.84 प्रति लिटर
  • नांदेड – ₹99.83 प्रति लिटर
  • परभणी – ₹99.83 प्रति लिटर
  • रत्नागिरी – ₹99.77 प्रति लिटर
  • बीड – ₹99.73 प्रति लिटर
  • हिंगोली – ₹99.71 प्रति लिटर
  • उस्मानाबाद – ₹99.65 प्रति लिटर
  • औरंगाबाद – ₹99.62 प्रति लिटर
  • गोंदिया – ₹99.58 प्रति लिटर
  • गडचिरोली – ₹99.57 प्रति लिटर
  • लातूर – ₹99.48 प्रति लिटर
  • अमरावती – ₹99.44 प्रति लिटर
  • सांगली – ₹99.38 प्रति लिटर
  • सातारा – ₹99.34 प्रति लिटर
  • नंदुरबार – ₹99.28 प्रति लिटर
  • सोलापूर – ₹99.28 प्रति लिटर
  • चंद्रपूर – ₹99.27 प्रति लिटर
  • वाशीम – ₹99.23 प्रति लिटर
  • भंडारा – ₹99.21 प्रति लिटर
  • बुलढाणा – ₹99.22 प्रति लिटर
  • अकोला – ₹98.88 प्रति लिटर
  • अहमदनगर – ₹98.77 प्रति लिटर
  • नागपूर – ₹98.78 प्रति लिटर
  • कोल्हापूर – ₹98.76 प्रति लिटर
  • नाशिक – ₹98.66 प्रति लिटर
  • पालघर – ₹98.62 प्रति लिटर
  • वर्धा – ₹98.53 प्रति लिटर
  • ठाणे – ₹98.41 प्रति लिटर
  • पुणे – ₹98.37 प्रति लिटर
  • धुळे – ₹98.36 प्रति लिटर
  • रायगड – ₹98.11 प्रति लिटर
  • मुंबई / ग्रेटर मुंबई – ₹97.83 प्रति लिटर

महाराष्ट्रातील शहरनिहाय CNG दर (प्रति किलो)

  • अहमदनगर – ₹103.02
  • अकोला – ₹99.53
  • अमरावती – ₹99.78
  • औरंगाबाद – ₹103.02
  • भंडारा – ₹92.93
  • बीड – ₹96.50
  • चंद्रपूर – ₹90.00
  • धुळे – ₹93.65
  • गडचिरोली – ₹89.50
  • गोंदिया – ₹89.50
  • हिंगोली – ₹84.95
  • जळगाव – ₹96.50
  • जालना – ₹96.50
  • कोल्हापूर – ₹96.95
  • लातूर – ₹85.50
  • मुंबई – ₹86.00
  • नागपूर – ₹88.90
  • नांदेड – ₹90.65
  • नंदुरबार – ₹94.64
  • नाशिक – ₹93.65
  • उस्मानाबाद – ₹85.50
  • पालघर – ₹79.50
  • परभणी – ₹90.65
  • पुणे – ₹96.50
  • रायगड – ₹84.00
  • रत्नागिरी – ₹85.50
  • सांगली – ₹103.02
  • सातारा – ₹103.02
  • सिंधुदुर्ग – ₹83.65
  • सोलापूर – ₹93.00
  • ठाणे – ₹86.00
  • वर्धा – ₹90.00
  • वाशीम – ₹84.95
  • यवतमाळ – ₹84.95

सर्वाधिक आणि सर्वात कमी CNG दर

सर्वाधिक दर: अहमदनगर, औरंगाबाद, सांगली आणि सातारा – ₹103.02 प्रति किलो
सर्वात कमी दर: पालघर – ₹79.50 प्रति किलो

महाराष्ट्रात पेट्रोलच्या बाबतीत जालना सर्वाधिक महाग शहर ठरले असून मुंबईत तुलनेने सर्वात कमी दर नोंदवले गेले आहेत. CNGच्या बाबतीत पालघरमध्ये सर्वात कमी दर असून औरंगाबाद, अहमदनगर, सांगली आणि सातारा येथे सर्वाधिक दर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *