Headlines

Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला…

कॅन्सरची लढाई अपयशी ठरली. प्रसिद्ध अभिनेता प्रदीप रावत (Pradeep Rawat) यांचं 4 जुलै 2026 रोजी निधन झालं. 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप रावत यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं. त्यांची प्रामुख्याने ‘लगान’ (Lagaan) आणि ‘गजनी’ (Gajini) या सिनेमात साकारलेली भूमिका प्रचंड गाजली.  त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीला (Entertainment) मोठा धक्का बसला.  5 जुलै 2026 रोजी त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.  त्यांच्या अंत्य संस्काराच्या विधीला बॉलिवूडमधील (Salman Khan) अनेक कलाकार उपस्थित होते.

सलमान खानची प्रदीप रावतसाठी भावुक पोस्ट (Salman Khan on Pradeep Rawat Post in Instagram)

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजली वाहिली.  अभिनेता सलमान खान याने देखील प्रदीप रावत यांच्या निधनानंतर एक भावुक पोस्ट शेअर केली. सलमान खान आणि प्रदीप राऊत या दोघांनी मिळून ‘बागी: अ रेबेल फॉर लव्ह’ या सिनेमात काम केलं होतं. बुधवारी सलमान खानने  आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर या सिनेमातील एक सीनचा स्क्रीनशॉट शेअर केला.

यात सलमान खान आण प्रदीप रावत एकत्र दिसत आहेत. सलमान खानने तो सीन शेअर केला. तसेच कॅप्शनमध्ये, ‘भाई, तुझ्यासोबत बरेच आनंदाचे क्षण घालवले. तुमच्या आत्म्यास शांती लाभो’, असं म्हटलं आहे.  प्रदीप रावतला  ब्लड कॅन्सर झाला होता.  ब्लड कॅन्सरवर उपचार घेत असतानाच त्यांचे 74 व्या वर्षी निधन झाले.   त्यांच्या पश्चात पत्नी कल्याणी रावत आणि मुलगा विक्रमादित्य रावत असा परिवार आहे.

प्रदीप रावत यांनी आपल्या कारकि‍र्दीत  हिंदी, तेलुगु,  तामिळ,  कन्नड आणि मल्याळम सिनेमात काम केलं. त्यांनी तीन दशकहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 2005 साली त्यांनी ‘गजनी’ या तामिळ सिनेमात काम केलं. ‘गजनी’ या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.  2008 साली त्यांनी हिंदी रिमेक  ‘गजनी’ सिनेमात आमिर खानच्या अपोझिट काम केलं होतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *