Headlines

गणपती पावला! पहिल्यांदाच ‘या’ मार्गावर धावणार गणेशोत्सव स्पेशल ट्रेन, पहा संपूर्ण वेळापत्रक

नांदेड–सावंतवाडी रोड–नांदेड ही विशेष रेल्वेसेवा गणपती उत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, नांदेड, परभणी, लातूर, परिसरासह मराठवाड्यातील प्रवाशांना कोकणातील विविध ठिकाणी जाण्यासाठी थेट आणि सोयीस्कर रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. दोन्ही दिशेने 2 फेऱ्या या गाडीच्या दोन फेऱ्या होतील.

गाडी क्र. 07659 नांदेड ते सावंतवाडी रोड ट्रेन्स ओन डिमांड विशेष गाडी हुजूर साहिब नांदेड येथून 12 आणि 15 सप्टेंबर 2026 रोजी (शनिवार आणि मंगळवार) रात्री 20 : 00 वाजता सुटेल आणि अनुक्रमे पुढील दिवशी सावंतवाडी रोड येथे सकाळी 03 :30 वाजता पोहोचेल.

परतीच्या दिशेने गाडी क्र. 07660 सावंतवाडी रोड ते हुजूर साहिब नांदेड ट्रेन्स ओन डिमांड विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दिनानंक 14 आणि 17 सप्टेंबर 2026 रोजी (सोमवार आणि गुरुवार) सकाळी 07:30 वाजता सुटेल आणि अनुक्रमे पुढील दिवशी हुजूर साहिब नांदेड येथे सकाळी 11:30 वाजता पोहोचेल. महत्त्वाच्या शहरांना जोडणारी विशेष सेवा ही विशेष रेल्वेगाडी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक महत्त्वाच्या शहरांना आणि पर्यटनस्थळांना जोडणार आहे.

विशेष ट्रेनला कुठे असणार थांबे : 

नांदेड–सावंतवाडी रोड–नांदेड या गाडीला गाडीला पूर्णा जं., परभणी जं., परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, येडशी, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना रत्नागिरी, चिपळूण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यांसह कोकणातील विविध भागात जाण्यासाठी थेट रेल्वेसेवेचा लाभ मिळणार आहे.

24 डब्यांची विशेष रेल्वेगाडी : 

विशेष रेल्वेगाडी एकूण 24 डब्यांची असून तिची संरचना पुढीलप्रमाणे आहे. वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकुलीत तृतीय श्रेणी, स्लीपर क्लास, सामान्य द्वितीय श्रेणी (General Second Class) आणि एस. एल. आर. असे मिळून 24 डब्बे आहेत.

गणपती उत्सवासाठी प्रवाशांना मोठा दिलासा: 

गणपती उत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता ही विशेष रेल्वेसेवा मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. या थेट रेल्वेसेवेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान गाड्या बदलण्याची आवश्यकता कमी होऊन अधिक सोयीस्कर, सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या विशेष सेवेचा लाभ नांदेड, परभणी, लातूर आणि मराठवाड्यातील इतर भागांतील प्रवाशांना घेता येणार असून, गणपती उत्सवासाठी कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही रेल्वेसेवा विशेष महत्त्वाची ठरणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन सुरक्षित, आरामदायी आणि सुविधाजनक रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वेसेवेचा लाभ घ्यावा आणि प्रवासापूर्वी गाडीची अद्ययावत वेळ व आरक्षणाची उपलब्धता तपासावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *