Headlines

तुकाराम मुंढेंच्या टार्गेटवर आता सौंदर्य प्रसाधनं, 15हून अधिक ब्युटी क्रीम्सवर बंदी, आरोग्यावर होत होता भयंकर परिणाम

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात विविध ठिकाणी धाडसत्र सुरूच आहे. आत्तापर्यंत मुंढे यांच्या विभागाने दूध भेसळ, मिठाईतील भेसळ, गुटखा विक्री यासारख्या ठिकाणी धाड टाकत कोट्यवधींचा माल जप्त केला आहे. त्याचबरोबर आता सौंदर्य प्रसाधनांवरही कारवाईचा धडाका सुरूच आहे. अलीकडेच एफडीएने 15 हून अधिक सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनांवर मोठी कारवाई केली आहे.

उजळ रंगाचे आकर्षण दाखवून विकल्या जाणाऱ्या 15हून अधिक ब्युटी क्रीम्सना अन्न व औषध प्रशासनाने गुणवत्तेच्या निकषांवर अपात्र ठरवले आहे. ही मलमे ‘प्रमाणित गुणवत्ता निकषानुसार नसल्याचे’ घोषित करून, त्यांनी विक्री, साठवणूक आणि वितरण तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एफडीएच्या तपासणीत ‘गोरी ब्युटी क्रीम’, ‘फेस फ्रेश गोल्डन स्टार’, एफडीएच्या तपासणीत ‘गोरी ब्युटी क्रीम’, ‘फेस फ्रेश गोल्डन स्टार’. काही उत्पादनांवर उत्पादकाचे नाव, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख आणि मुदत समाप्तीची तारीख यांची माहितीही नसल्याचे आढळले. एफडीएने वितरक, विक्रेते आणि ई-कॉमर्स कंपन्यांना ही उत्पादने तातडीने बाजारातून मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पाकिस्तानातून आयात केलेल्या अंदाजे 39 लाख रुपये किमतीच्या सौंदर्य प्रसाधने नांदेडमध्ये जप्त करण्यात आली आहेत.

ग्राहकांना अवाहन

ग्राहकांनीही अशी उत्पादने वापरणे त्वरित थांबवावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्वचेवर वापरायची औषधे किंवा सौंदर्यप्रसाधने वापरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अशा क्रीम्सचा दीर्घकाळ वापर केल्यास त्वचेचे नुकसान होण्याबरोबरच मूत्रपिंडाचे विकार, मज्जासंस्थेचे आजार, स्मरणशक्ती कमी होणे आणि प्रजननक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते.

अन्न व औषध प्रशासनाने मुंबई, पुणे, सातारा, हिंगोली, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर विभागात धडक कारवाई करत 11 हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅन्टीनचे परवाने निलंबित केले आहेत. मुंबईतील मित्रा दा ढाबा (भांडुप) येथे मांस प्रक्रिया परिसरात भटके कुत्रे आणि मांजरांचा वावर, कीटकांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ स्वयंपाकगृह, निकृष्ट अन्न साठवणूक आणि कचरा व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी आढळल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *