अमरावती शहरात नवजात बाळाच्या विक्रीच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिच्या नवजात बाळाची साडेतीन लाख रुपयांना विक्री केल्याचा गंभीर आरोप एका महिला डॉक्टरवर करण्यात आला आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारासंदर्भात एक ऑडिओ क्लिप समोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सहसंपर्कप्रमुख वर्षा भोयर आणि युवती सेना प्रमुख कोमल बद्रे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. दरम्यान या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात महिला डॉक्टर, तिचा पती आणि एका अल्पवयीन मुलाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून महिला डॉक्टर आणि तिचा पती फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र बाळाच्या विक्रीबाबतचे आरोप आणि आर्थिक व्यवहाराची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.
अमरावती शहरात अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्या त्यानंतर तिच्या नवजात बाळाच्या विक्रीचा गंभीर प्रकार समोर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका महिला डॉक्टरने अल्पवयीन मुलीची प्रसूती केल्यानंतर बाळाची साडेतीन लाख रुपयांना विक्री केल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मात्र, बाळाची विक्री नेमकी कोणाला करण्यात आली या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि बाळ सध्या कोणाकडे आहे याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक दाव्याची पडताळणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणात महिला डॉक्टरशी संवाद साधतानाची असल्याचा दावा करण्यात येणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमधील संभाषणावरून कथित व्यवहारासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच ऑडिओ क्लिपच्या आधारे हे प्रकरण समोर आल्याची चर्चा आहे. मात्र या ऑडिओ क्लिपची स्वतंत्रपणे सत्यता पडताळण्यात आलेली नाही. क्लिपमधील आवाज नेमका कोणाचा आहे, संभाषणाचा पूर्ण संदर्भ काय आहे आणि त्यातील दाव्यांना पुराव्यांचा आधार आहे का, याची तपासणी होणे गरजेचे आहे. या व्हायरल क्लिपची झी २४ तास पुष्टी करत नाही.
या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात महिला डॉक्टर, तिचा पती आणि अल्पवयीन मुलाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून महिला डॉक्टर आणि तिचा पती फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न असणार उपस्थित झाले असून अल्पवयीन मुलीची प्रसूती कोणत्या परिस्थितीत झाली? नवजात बाळाच्या हस्तांतरणामागे नेमका काय व्यवहार होता? साडेतीन लाख रुपयांच्या व्यवहाराच्या आरोपाला कोणते पुरावे आहेत? तसेच, या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का? या सर्व बाबींचा तपासातून उलगडा होणे अपेक्षित आहे
शिंदे गटाच्या शिवसेनेच्या सहसंपर्कप्रमुख वर्षा भोयर आणि युवती सेना प्रमुख कोमल बद्रे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले असून या प्रकरणानंतर नवजात बाळाच्या सुरक्षिततेचा अल्पवयीन मुलीच्या संरक्षणाचा आणि कथित बेकायदेशीर व्यवहाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे. नवजात बाळाचा शोध, संबंधित व्यक्तींची चौकशी, आर्थिक व्यवहाराची पडताळणी आणि व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता तपासणे या बाबींना महत्त्व प्राप्त झाले आहे
एकीकडे नवजात बाळाच्या विक्रीचा गंभीर आरोप, तर दुसरीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप या प्रकरणामुळे अमरावती शहरात खळबळ उडाली आहे. मात्र व्हायरल क्लिप किंवा आरोपांनाच अंतिम सत्य मानता येणार नाही. पोलीस तपासात नेमके काय निष्पन्न होते, बाळाचा ठावठिकाणा लागतो का आणि या प्रकरणामागील संपूर्ण सत्य समोर येते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
