Headlines

‘मी रिक्षा चालवणार, पैसाही कमावणार पण मराठी नाही बोलणार’; यूपीच्या रिक्षाचालकाचे थेट प्रताप सरनाईकांना आव्हान!

महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने मराठी भाषेची सक्ती केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर इथल्या मातीतील भाषा बोलते येणे गरजेचं आहे. त्यामुळं राज्य सरकारने महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य केली असून यासाठी 15 ऑगस्टची डेडलाईनदेखील देण्यात आलीय. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील रिक्षा व टॅक्सी चालकांना अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आता थेट राज्य सरकार कायदाच करणार आहे. असे असले तरी काही परराज्यातून आलेल्या रिक्षाचालकांची मुजोरी गेलेली दिसत नाही. एका रिक्षा चालकाने थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाच मराठी बोलणार नाही, असे आव्हान दिलंय. यावर सरनाईकांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलंय नेमकं?

“मराठीतून बोलणार नाही, अशी मुजोरी नवी मुंबईतील उत्तर भारतीय रिक्षा चालकाने दाखवली आहे. “पैसे कमावणार, पण मराठी बोलणार नाही”, असे म्हणत रिक्षा चालकाने सरकारला आव्हान दिलंय. संजय दुबे असं या उत्तर भारतीय व्यक्तीच नाव असून व्हिडिओ ऐकल्यानंतर मराठी माणसाच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.

परिवहन मंत्र्यांना आव्हान

‘मी रिक्षा चालवणार, पैसाही कमावणार पण मराठी नाही बोलणार’, असे आव्हान रिक्षा चालकाने परिवहन मंत्र्यांना दिले आहे.श्रीराम संस्था प्रमुख अंतंर्गत उत्तर भारतीय विकास सेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संजय दुबेने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले आहे. तुम्ही विचार करा, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आजची डेडलाईन दिली. मराठी न बोलणाऱ्या टॅक्सी, रिक्षा चालकांना मराठी न आल्यास परवाना रद्द होईल, असे ते म्हणतात.

एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची आशा अजूनही कायम? बड्या नेत्याच्या विधानाने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या; भविष्यात काय होणार?

आम्ही गुलामी करणार नाही

परप्रांतीयांनी गुलामी करा, असे ते म्हणतायत. आम्ही गुलामी करणार नाही. आम्ही प्रेमान तुम्हाला इज्जत देऊ पण तुमच्या पॉवरने तुम्हाला वाटत असेल तर होणार नाही. तुमचे सरकार जास्त दिवस चालणार नाही. तुमचे सरकार लवकरच पडणार आहे. नशिबाने तुम्ही परिवहन मंत्री बनलात आणि आम्हाला थेट धमकी देता?  मी जिल्हाध्यक्ष आहे. मी तुमच्या धमकीला घाबरणारुन कधी मराठी बोलणार नाही. मी गुलामी करणार नाही., असे संजय दुबे म्हणाले.

‘मला धमकीचा फोन आला’ 

मला फोनवर धमकी आली आहे. संजय दुबे तू कुठे आहेस? मी येतो. तुझे हात-पाय तोडायचे आहेत, असे तो म्हणाला. मी त्याला कुठे येऊ विचारलं. धमकीला संजय दुबे घाबरणार नाही. मग संजय दुबे कधीच मराठी बोलणार नाही.

‘संजय दुबे कधी झुकणार नाही’

प्रेमाने, सन्मानाने बोललात तर आमचे सर्व यूपी बिहारी रिक्षावाले मराठी बोलतील. गुंडगिरी केलीत तर ऐकणार नाही, मनसेवाला असो, शिवसेनेवाला असो, भाजप असूदे किंवा काँग्रेसवाला असूदे. संजय दुबे कधी झुकणार नाही. आदर दिलात तर आदर मिळेल, असे संजय दुबे म्हणाले.

काय म्हणाले सरनाईक?

अनेक चालक मराठी शिकले आहेत. असे व्हिडीओ समोर येत आहेत. एकदा कायदा झाला आणि कारवाई सुरु झाली की यांना उत्तर दिलं जाईल, असे स्पष्टीकरण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *