पुण्यातील मोशी येथे कचरा डेपो दुर्घटनेतील मृत नागेश गायकवाड यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भोसरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र त्यांनी आत्महत्या कशामुळं केली, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. सोनाली नागेश गायकवाड (23) असं त्यांचे नाव आहे.
8 जुलै रोजी पिंपरी-चिंचवड येथील मोशी कचरा डेपोत कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला होता. नागेश गायकवाड यांचादेखील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला होता. या घटनेला एक महिना उलटून काहीच दिवस झाले असताना आता त्यांच्या पत्नीनेही आत्महत्या करत जीवन संपवलं आहे. या घटनेने कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांना नागेश यांच्या पत्नीची कोणतीही सुसाइट नोट आढळली नाही. काल संध्याकाळच्या सुमारास त्यांनी सोनाली गायकवाड यांनी गळफास घेत आत्महता केली आत्महत्या केली. सोनाली यांचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला असून पोस्टमार्टम सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसंच, त्यांनी आत्महत्या का केली याची चौकशीदेखील पोलिसांकडून सुरू आहे.
नागेश यांच्या मृत्यूनंतर सोनाली या प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या. त्या गृहणी असून त्यांना दोन मुली असून एकाची वय चार वर्ष व एकीचे वय दीड वर्ष इतके आहे. नागेश पाठोपाठ अवघ्या एक महिन्याच्या अंतराने सोनालीने जीवन संपवल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर दोन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरचे मायेचे छत्र हरवल्याची भावना व्यक्त करण्यात येते.
पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत 26 वर्षीय नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. नागेश हे तिथे तीन वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करत होते. नागेश यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला होता. तर, आता सोनालीनेही जीवन संपवल्याने आई-वडिलांच्या मायेला मुली पोरक्या झाल्या आहेत.
