Headlines

लग्नमंडपात नवऱ्यावर डिझेलचे कॅन ओतून जिवंत…; येवल्यातील हादरवणारी घटना; 7 ते 8 जण जखमी

लग्नाच्या मंडपात नव-यामुलासह त्याच्या नातेवाईकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहाच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी हा हल्ला केला. येवला शहरातील एका लॉन्समध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत सात ते आठ जण जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून दोन्ही बाजूनं गुन्हा नोंदवला आहे.

येवल्यातील तरुणाचं निफाड तालुक्यातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी पळून जाऊन नोंदणीकृत लग्न केलं. त्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी दोघांचा रितसर विवाह सोहळा आयोजित केला. मात्र प्रेम विवाहाचा राग मनात धरत मुलीच्या नातेवाईकांनी लग्न सोहळ्यात डिझेलचे कॅन ओतून नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यात सात ते आठ जण जखमी झाले आहेत.

येवला शहरातील ऋषभ दीपक भगुंडे तरुणाचे निफाड तालुक्यातील रामपूर नैताळे येथील एका तरुणीसोबत प्रेम संबंध होते. या दोघांनी पळून जाऊन सप्टेंबर महिन्यात हिंदू विवाह कायद्यांतर्गत नोंदणीकृत विवाह केला होता. यानंतर येवला शहरातील एका लॉन्समध्ये नवरदेवाकडील नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा आयोजित केला होता. विवाहसोहळा सुरू असताना मुलीच्या नातेवाईकांनी प्रेम विवाहाचा राग मनात ठेवून लग्न सोहळ्यात डिझेलचे कॅन आणले आणि नवरदेव व त्याच्या नातेवाईकांच्या अंगावर ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी मारहाणही केली. यावेळी नवरदेवाच्या नातेवाईकांनी देखील प्रतिकार केल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. उपस्थितांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केली.

दरम्यान या घटनेची माहिती येवला शहर पोलिसांना मिळतात त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून दोन्ही बाजूने गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *