Headlines

लोकलमधून महिला खाली पडली, LIVE व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद, मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान घटना

मुंबईत रोज लाखोंच्या संख्येने प्रवासी लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. गर्दीने तुडुंब वाहणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना अनेकजण आपला जीव धोक्यात घालतात. धावत्या ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. या दुर्घटना, अपघात रोखण्यासाठी लोकल ट्रेनची संख्या वाढवणं यासारख्या अनेक मागण्या प्रवासी संघटनेकडून केल्या जातात. मात्र अद्यापही लोकलवरील ताण मात्र कमी झालेला नाही. त्यातच आता पुन्हा एकदा एक महिला लोकलमधून खाली पडल्याची घटना समोर आली आहे. मध्य रेल्वेवर ही घटना घडली आहे.

नेमकी घटना काय?

मध्य रेल्वेवर महिला लोकलमधून खाली पडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान हा प्रकार घडला आहे. लोकल सिग्नलला थांबलेली असतानाच महिला दोन ट्रॅकच्या मधे पडली. सुदैवाने लोकल थांबलेली असल्याने महिलेला जास्त दुखापत झाली नाही. पण खाली असणाऱ्या खडींवर पडल्याने तिला मुका मारला लागला असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *