बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाची हजेरी, हवामान विभागाने दिला 4 आठवड्यांचा अंदाज, तुमच्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसणार का?
सप्टेंबर महिन्यात पावसाबाबत दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने राज्यात ओढ दिली होती. त्यामुळं अनेक भागात पावसाची तूट नोंदवली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात काही प्रमाणात पावसाने दिलासा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी पुढील चार आठवड्यांचा अंदाज जारी केला असून, त्यानुसार राज्यात टप्प्याटप्प्याने पाऊस जोर धरणार आहे. तर आज पूर्व विदर्भातील, गोंदिया, गडचिरोली…
