Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
नेदरलँड्स क्रिकेट संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने अचानक कर्णधारपदाचा राजीनामा देत क्रिकेटविश्वाला धक्का दिला आहे. जून 2022 पासून संघाची धुरा सांभाळणाऱ्या एडवर्ड्सचा कार्यकाळ शुक्रवारी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 च्या युट्रेक्ट टप्प्यानंतर संपला. त्याच्या जागी स्टार अष्टपैलू बास डी लीडे याची नेदरलँड्सच्या नव्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून, तो लीग 2 मधील उर्वरित सामन्यांमध्ये संघाचे…
