धक्कादायक! मुंबईत ‘मॅनहोल’मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; रेस्कू ऑपरेशन सुरू, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
राज्यभरात पावसाने हाहाकार घातला असून मुंबईतही (Mumbai) पावसामुळे (Rain) दुर्घटना घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. तर, मुंबईतील पावसाच्या पहिल्याच दिवशी, गेल्या आठवड्यात महापालिकेचा एक अधिकारीच मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा साकीनाका खैरनी रोड येथील मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला असून त्यास वाचविण्याचे प्रयत्न…
