Buldhana News: “हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही, तुम्ही सहपरिवार घरी या, खिचडी…”,बुलढाण्यात संतप्त लाभार्थ्यांनी तहसीलदारांच्या कॅबिनसमोर टाकला रेशनचा तांदूळ
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (रेशन) मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या धान्यामुळे त्रस्त झालेल्या लाभार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक चिखली येथे पाहायला (Buldhana News) मिळाला. रेशन दुकानातून मिळालेला अत्यंत निकृष्ट दर्जाचा तांदूळ हातात घेऊन संतप्त लाभार्थ्यांनी थेट चिखली तहसील कार्यालयात धाव घेतली आणि तहसीलदारांच्या दालनासमोरच तो ओतून प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला. “या तांदळाची खिचडी (Buldhana News) तहसीलदारांनी त्यांच्या बायका-पोरांसोबत खावी, मग…
