Headlines

Sonu Nigam Health: मानेच्या नसा दबल्या, MRI, सिटी स्कॅन सुरू, सोनू निगमच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याचे चाहते सध्या काळजीत आहेत. कारण ठरतंय त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलेला एक व्हिडिओ. या व्हिडिओत त्यानं आपल्या तब्येतीविषयी एक धक्कादायक आणि चिंताजनक माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनू निगम एका अत्यंत वेदनादायी आजाराचा सामना करत आहे. त्याच्या मानेच्या नसा दबल्या गेल्या असून (Pinched Nerves), यामुळं त्याला प्रचंड त्रास होत असल्याचं त्यानं सांगितलं आहे. मात्र, इतक्या त्रासात असतानाही त्याने आपला आगामी शो रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे.

एमआरआय आणि सिटी स्कॅन सुरू

सोनू निगमनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याच्या खांद्यावर आणि मानेजवळ एक बँडेज (पॅच) लावलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सोनू म्हणाला की, माझ्या मानेच्या नसा दबल्या गेल्या आहेत. गेल्या एका आठवड्यापासून माझं एमआरआय आणि सिटी स्कॅन सुरू आहेत. मी खूप औषधे घेत आहे आणि माझी फिजिओथेरपी देखील सुरू आहे.

फिजिओथेरपी अत्यंत वेदनादायी; आवाजावरही झाला परिणाम
आपल्या उपचारांबद्दल बोलताना सोनूनं सांगितलं की, माझी फिजिओथेरपी अत्यंत वेदनादायी होती. सध्या मी पेनकिलर्स (वेदनाशामक औषधे) घेत आहे. नसांना आराम देण्यासाठी जी औषधे आणि मसल रिलॅक्संट्स मी घेत आहे, त्यामुळं माझा गळा थोडा जड झाला आहे. एका गायकासाठी स्टेजवर परफॉर्म करण्यापूर्वी गळा जड होणे ही अत्यंत चिंतेची बाब असतं, हेही त्यानं आवर्जून नमूद केलं.

…पण तरीही गाणार!
जवळपास दीड महिन्यानंतर सोनू निगम स्टेजवर परफॉर्म करणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर आणि त्यातच या आजारपणामुळं त्याचा आत्मविश्वास काहीसा डगमगला आहे. व्हिडिओमध्ये त्यानं प्रांजळपणे कबूल केलं की, बऱ्याच दिवसांनी मी परफॉर्म करत आहे आणि त्यातच ही तब्येत, त्यामुळं माझा आत्मविश्वास सध्या कमी झाला आहे. गळाही पूर्ण साथ देत नाहीये. पण मी मागे हटणार नाही. देवाने मला स्टेजवर गाण्याची आणि हा त्रास सहन करण्याची शक्ती द्यावी, हीच प्रार्थना.

दरम्यान, सोनू निगमचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याचे कोट्यवधी चाहते आणि बॉलिवूडमधील सहकलाकार भावूक झाले आहेत. अलिशा चिनॉय, कविता सेठ आणि रूपकुमार राठोड यांच्यासह अनेक संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी त्याच्या पोस्टवर कमेंट्स करत तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *