Headlines

नवी मुंबईत भीषण अपघात; 10 जणांना कारने उडवले, दोघांचा मृत्यू

नवी मुंबईत भीषण अपघात झाला आहे. एकता भरधाव कारने रस्त्यात माणसे वाहने जे दिसेल त्याला धडक दिली आहे. या वाहनाने  10 जणांना उडवले आहे. या भीषण अपघतात दोघांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघतामुळे घटना स्थळी एकच गोंधळ उडाला.

 

नवी मुंबईतील  तळोजा सेक्टर 10 मध्ये हा भीषण अपघात झाला आहे. कार चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या भरधाव कारने 10 जणांना उडवले. 2 ते 3 वाहनांना देखील या कारने धडक दिली.  अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर,  8 जण जखमी झाले आहेत. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  असून काहींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

अपघातामुळे परिसरात खळबळ माजली आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने ताडीने मदतकार्य सुरु करण्यात आले. या अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.  दरम्यान, अपघातानंतर ड्रायव्हर कार आहे तिथेच सोडून घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून फरार वाहन चालकाचा शोध सुरु केला आहे.

बस चालवत असतानाच ड्रायव्हरला फीट आली आणि…

वडाळा डेपोची बेस्ट बस क्रमांक 8230 मुंबई वरून वाशी टोल नाका येथे आली असता अचानक चालक किरण जाधव यांना फिट आली. फिट आल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण होताच वाहक किशोर गुरव यांनी धाडस आणि प्रसंगावधान दाखवत बसचे स्टेअरिंग स्वतःच्या ताब्यात घेतले. संभाव्य मोठा अपघात टाळण्यासाठी त्यांनी बस टोल नाक्याच्या बॅरिअरवर वळवून थांबवली. या धाडसी निर्णयामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या घटनेत चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर एका प्रवश्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *