School Diwali Holidays 2026: शाळांना २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी! प्राथमिक अन् माध्यमिकच्या तारखा जाहीर; शाळा उघडताच परीक्षा
शहरातील राज्य मंडळाशी संलग्न शाळांना दि. २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू होणार आहे. प्राथमिक शाळांची सुट्टी १७ नोव्हेंबरपर्यंत, तर माध्यमिक शाळांची सुट्टी १८ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. एक दिवसाच्या फरकाने प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होणार असून, त्यानंतर संकलित चाचणी-१ व सहामाही परीक्षा होणार आहे. दरवर्षी शाळांना वर्षभरात उन्हाळ्याची व दिवाळीच्या अशा दोन मोठ्या सुट्ट्या मिळतात….
