दरड कोसळल्याप्रमाणे कचरा इमारतीवर आला; पिंपरीमध्ये इमारत कोसळल्यानंतर अधिकाऱ्याने सांगितला घटनाक्रम, आतमधून मदतीसाठी आवाज
पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागात बुधवारी दुपारी एका तीन मजली इमारतीचा मोठा भाग कोसळला आहे. इमारत कोसळल्याने किमान 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या इमारतीत कचरा प्रक्रिया केंद्राचे प्रशासकीय कार्यालय होतं. मुसळधार पावसामुळे इमारतीशेजारील कचऱ्याचा मोठा ढिगारा सरकल्याने ही इमारत कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवडमधील मोशी भागात असलेल्या या घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती…
