‘शपथा आणि शिवबंधन नव्हे, माणुसकीच्या बंधनाने खासदार टिकतात’, भाजपचा ठाकरेंवर निशाणा!
भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना म्हटले की, शपथा किंवा शिवबंधन बांधून आमदार-खासदार टिकत नाहीत. त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीच्या बंधनाची गरज असते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे बंधन राहिले नसल्यामुळेच उबाठा गटातील लोक सातत्याने पक्ष सोडत असल्याचा दावा त्यांनी केला. संजय राऊत यांनी केलेल्या खरेदी-विक्रीच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना…
