मुंबई, ठाण्यासह कोकणात पाऊस, मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा; कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
जवळपास दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या विश्रांतीवर गेलेल्या पावसानं पुन्हा एकदा महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्येसुद्धा पाऊस पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी रात्रीपासूनच मुंबई शहरासह उपनगरात रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील एकंदर पर्जन्यमानाचा कल पाहता पुढील 24 तासांसाठी…
